ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सिलेंडर

नेवासा – डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. तेल वितरक कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे. यापूर्वी, नोव्हेंबर महिन्यामध्येही व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर वाढले होते. आता पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आलेत. १९ किलोचा सिलेंडर १८ रुपयांनी महागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या आघाडीवर सरकारने भाव स्थिर ठेवले आहेत.

सिलेंडर

तर काही महिन्यांपूर्वी त्यावर सबसिडी जाहीर केली होती. त्यामुळे मध्यंतरी ११०० रुपयांच्या दरात मिळणारा सिलेंडर आता ८०० ते ९०० रुपयांदरम्यान मिळत आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत – वाढ केली असून, १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

ऑक्टोबर – नोव्हेंबरपासून इंडीयन ऑइलने व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत ६२ रुपयांची वाढ केली. मुंबईत १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १६९२.५० रुपयांऐवजी १७५४ रुपयांपर्यंत वाढली होती.

सिलेंडर
newasa news online
सिलेंडर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सिलेंडर
सिलेंडर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सिलेंडर
error: Content is protected !!