ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दर्गा

कुकाणा येथे हजरत सय्यद न्यामत बाबा दर्गा उत्सव संबंधित आज मंगळवारी 3 डिसेंबर रोजी धनंजय जाधव पोलीस निरीक्षक नेवासा यांनी यात्रा कमिटीची दर्गा परिसरामध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये अब्दुल हफिस शेख, अमोल अभंग, वसंतराव देशमुख, भाऊसाहेब कोलते, कारभारी गोरडे, विलास देशमुख, इस्माईल शेख, राम जाधव, दौलत देशमुख, बालमभाई शेख, बाळासाहेब कापरे, एकनाथ कापरे, इनुस बालंदर, अरुण कुमार देशमुख, मुसाभाई इनामदार, इकबाल इनामदार, शकूर शेख, रामदास गोल्हार ईत्यादी उपस्थित होते.

बैठकीमध्ये स्थानिक नागरिकांनी मागील अनुभवावरून तक्रारी वजा सूचना मांडल्या. यामध्ये तरवडी चौकात पोलीस राऊटी उभारणे, दर्ग्याच्या पाठीमागे पोलीस पिंजरा उभा करणे, साधे वेषात पोलीस नेमणे, डीजे डॉल्बीला परवानगी देऊ नये. तमाशा कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, मोटर सायकलचे सायलेन्सर काढून मोटर सायकल पळवतात, हगामा बंदोबस्त इत्यादी सूचना मांडल्या.

दर्गा


स्थानिक यात्रा कमिटी व नागरिकांनी मांडलेल्या सर्व सूचनेवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
उत्सव काळामध्ये कोणीही डॉल्बी लावून चादर मिरवणूक काढणार नाही तसेच मोटर सायकलचे सायलेन्सर काढून कोणीही वाहने पळवणार नाहीत. या बाबतच्या सक्त सूचना पोलिसांना दिल्या असून सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले आहे. तसेच छेडछाड, रोमिओगिरी, टिंगल-टवाळी करणाऱ्या मुलांवर कठोर कारवाई करण्यासाठी साध्या वेषातील पथक देखील कार्यरत राहणार असल्याचे सांगितले आहे.
बैठकीच्या वेळी कुकाणा दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पोलीस नाईक काळोखे, गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल अवी वैद्य, रसाळ, फाटक, महिसमाळे इत्यादी हजर होते.

दर्गा
दर्गा
दर्गा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दर्गा
दर्गा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दर्गा
error: Content is protected !!