ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

नेवासा – वाकडी (ता. नेवासा) येथे मांजरीला वाचविण्यासाठी एका मागोमाग एकाला एक वाचविण्यासाठी गेलेल्या पाचजणांचा बायोगॅसच्या विहिरीत गुदमरुन दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यात हळहळ व्यक्त होत असून गुरुवार (दि.११) रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाकडी येथील काळे वस्तीवर भेट देऊन काळे कुटुंबियांचे सांत्वन केले.

तसेच दुर्घटना घडलेल्या विहिरीची पाहणी केली. विहिरीतून सुदैवाने बचावलेले विजय माणिक काळे यांच्यावर नगर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी मंत्री विखे यांनी संपर्क साधला.त्यांच्यासमवेत आ. बाळासाहेब माजी मुरकुटे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, ऋषिकेश शेटे, शिवसेनेचे भाऊसाहेब वाघ, दीपक पटारे, प्रताप चिंधे, बाळासाहेब क्षीरसागर, दत्तात्रय पोटे, पुरूषोत्तम सर्जे, नरेंद्र काळे आदींसह भाजप- सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री विखे यांनी दुर्देवी घटनेचे दुःख व्यक्त करत अजय काळे व विनायक काळे यांच्यासह काळे कुटुंबियांचे सांत्वन केले. ना. विखे यांनी वाकडी येथे येण्यापूर्वी या घटनेत आदिवासी समाजाचे बाबासाहेब गायकवाड यांचाही दुर्देवी मृत्यू झाला होता, त्यांच्या कुटुंबियांची सलाबतपूर येथे भेट देऊन सांत्वन केले. त्यानंतर ना. विखे यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या शिरसगाव येथील निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी वाकडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

newasa news online
राधाकृष्ण विखे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राधाकृष्ण विखे
राधाकृष्ण विखे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राधाकृष्ण विखे