ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दहीहंडी

नेवासा – तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथे गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी बाबांच्या प्रेरणेने व युवा कीर्तनकार हभप लक्ष्मण महाराज नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित वीस दिवशीय बालसंस्कार शिबिराची सांगता देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने काल्याची दहीहंडी फोडून करण्यात आली.भावी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी बाल संस्कार शिबीरे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना
केले.
   श्री कालभैरवनाथ देवस्थानच्या सभामंडपात झालेल्या काल्याच्या किर्तनात बोलतांना स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज म्हणाले की परमार्थ व परमेश्वराची भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे,भगवंत हा भावाचाच भुकेला आहे,जो भक्त भगवंताचे नाम चिंतन करून भक्ती करतो त्यास ब्रम्ह सुखाची प्राप्ती होत असते,ही ब्रम्ह सुखाची प्राप्ती सर्वांना व्हावी म्हणून गुरुवर्य देवगडच्या बाबांनी भक्तीच्या माध्यमातून परमार्थ फुलवला म्हणूनच आज भक्तांना खऱ्या अर्थाने भक्ती सुखाचा आनंद जीवनात प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दहीहंडी


   यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचे वर्णन करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.वारकरी बालसंस्कार शिबिरातू शेवटच्या श्वासापर्यंत आईवडिलांची सेवा करणारी संस्कारशील व निर्व्यसनी पिढी घडेल,बाल संस्कार शिबिराची शिदोरी ही भावी पिढीला ऊर्जा देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त करून त्यांनी शिबीर यशस्वी केल्याबद्दल संयोजक हभप लक्ष्मण महाराज नांगरे व सहकार्य करणाऱ्या महाराज मंडळींचे कौतुक करून धन्यवाद दिले.
   यावेळी वीस दिवस चालणाऱ्या वारकरी बालसंस्कार शिबिरात सकाळ संध्याकाळ अन्नदान करणाऱ्या दात्यांचा स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन गौरव करण्यात आला.बाल संस्कार शिबिराचे मुख्य संयोजक युवा कीर्तनकार गायनाचार्य हभप लक्ष्मण महाराज नांगरे यांनी शिबिरात योगदान दिल्याबद्दल सर्व महाराज मंडळींचे आभार मानले.


   यावेळी झालेल्या काला किर्तन प्रसंगी रामनाथ महाराज पवार,संजय महाराज सरोदे,विजय महाराज पवार,सचिन महाराज पवार,दुर्योधन महाराज भोंगळ,गिरीजीनाथ महाराज जाधव,बाबासाहेब महाराज सातपूते,गणेश महाराज तनपूरे,सुगम महाराज शिंदे,भास्कर महाराज मुळक, रामनाथ महाराज शेळके,श्री कालभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव कोलते, विश्वस्त दिनकर हारदे,बी.जी. मिटकरे,सीताराम घोरपडे, सचिव दिलीप नळघे,सरपंच इंजिनियर आनंद नांगरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहीहंडी
दहीहंडी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दहीहंडी
दहीहंडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दहीहंडी