ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

नेवासा – 16 डिसेंबर 2011 साली दिल्ली येथे घडलेल्या निर्भया घटनेनंतर नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने मदत पोहचवण्यासाठी देशभर डायल-112 हि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सुरू केलेली आहे. राज्यांमध्ये देखील 9 सप्टेंबर 2021 पासून या आपत्कालीन यंत्रणेची सुरुवात झालेली आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये-112 या टोल फ्री क्रमांकवर कोणत्याही मोबाईलवरून कॉल केल्यानंतर पोलीस तातडीने मदत पोहोचवतात. परंतु ही सेवा सुरू झाल्यापासून या सेवेचा काही खोडसाळ व बेजबाबदार नागरिकांनी अनेकदा गैरवापर केल्याचे दिसून येते.

वास्तविक पाहता सदरची आपत्कालीन प्रतिसाद सेवा ही जे नागरिक केवळ आणि केवळ आपत्कालीन परिस्थितीमध्ये आहेत अशा नागरिकांना तातडीने मदत देणे हा या सेवेच्या पाठीमागील उद्देश आहे. परंतु मागील काळामध्ये काही खोडसाळ व बेजबाबदार नागरिक हे या यंत्रणाचा सर्रासपणे वापर केल्याचे दिसून येते, त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्या नागरिकांना त्या वेळी आपत्कालीन यंत्रणेचाची गरज असताना देखील तातडीने मदत न पोहोचता मदत देण्यात उशीर होतो. अशाच प्रकारची घटना दिनांक 27/05/2024 रोजी रामडोह येथील तुकाराम बाबुराव गोरे या व्यक्तीने 112 या क्रमांकावर पोलिसांना फोन करून रामडोह गावांमध्ये काही लोकांमध्ये मारहाण चालू असून एक 25 वर्षीय व्यक्ती मरण पावला आहे अशी माहिती दिली.

नेवासा पोलीस रामडोह येथे तातडीने पोहचले असता ज्या व्यक्तीने फोन केला आहे त्या व्यक्तीला भेटल्यानंतर माझाच मर्डर झाला आहे अशी बेजबाबदारपणे पोलिसांना माहिती दिली. असा खोटा कॉल केल्याने पोलिसांनी फिर्याद दाखल करून या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता कलम 177 अन्वये पोलीस ठाणे नेवासा येथे गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यास दोन वर्षापर्यंत शिक्षा आहे. डायल-112 ही केवळ आपत्कालीन प्रतिसाद परिस्थितीमध्ये वापरायची यंत्रणा असल्याने नागरिकांनी या यंत्रणेचा सर्रासपणे वापर न-करता केवळ आपत्कालीन परिस्थितीमध्येच कॉल करावा अशी अपेक्षा आहे.

newasa news online
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा