घोडेगाव – दि. 7 जुलै रोजी सुरत येथे जैन शास्त्रीय संगीत भजन गायन स्पर्धा संपन्न झाली. या मधे घोडेगाव या नेवासा येथील ऋषभ प्रविण राठोड याने अठरा वर्षं वयोगटा मधे प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत ऋषभने महाविरा भजन गायोरे मोरा तन मन ध्यान लगायोरे हे पुरानी बंदिश अहिर भैरवी शास्त्रीय रागामध्ये भजन गायले. ऋषभ चे शालेय शिक्षण जि प शाळा व श्री घोडेश्वरी माध्यमिक विद्यालय घोडेगाव येथे झाले. तर हेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर येथे प्रथम वर्ष बी ए या वर्गात शिकत आहे. रासने नगर मधील पवन नाईक यांच्या कडे तो शास्त्रीय संगीत शिक्षण घेत आहे.
बालपणा पासुनच कलेची आवड असलेल्या ऋषभने रांगोळी चित्रकला मधे बक्षीसं मिळवली आहेत वयाच्या आठ नऊ वर्षापासुन तो गीत गाताना कडे वळला . घरिच गाणं शिकला. आचार्य आनंद ऋषीजी साहेब जयंती निमित्ताने त्याने प्रथम आंनदधाम येथे भजन गायले . तेव्हा आदर्श ऋषीजींनी पहिल्यांदा पाठीवर कौतुकाची थाप दिली. नंतर पुणे येथे जैन भजन स्पर्धेत गंगाराम, वडगाव शेरी येथील भजन स्पर्धेत ही बक्षीस मिळविले. ऋषभच्या यशा बद्दल घोडेगाव मधील नागरिकांनी त्याचा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे सन्मान गुरुवारी सायंकाळी सहा शाल ,श्रीफळ , फेटा,पुष्प गुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सेवेकरी एकनाथ जाधव,मुळाचे माजी संचालक नानासाहेब रेपाळे,
कांदा आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक एळवंडे, श्री घोडेश्वरी देवी यात्रा उत्सव समिती अध्यक्ष जनार्दन सोनवणे, शनैश्वर विद्यालय सोनई चे माजी प्राचार्य पांडुरंग सोनवणे, अॅड भरत शिंदे,ग्रामपंचायत माजी सदस्य नवनाथ वैरागर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश चौधरी सह महिला भगीनी उपस्थीत होत्या.ऋषभ ने घोडेगाव चे नाव भारतात उज्वल केले अडिच हजार स्पर्धक असताना यशश्री खेचून आणली. शास्त्रीय भजन क्षेत्रामधे आणखी यश संपादन करावे .अशा शुभेच्छा मुळाचे माजी संचालक नानासाहेब रेपाळे, अशोक एळवंडे यांनी दिल्या. समस्त हिंदू व जैन धर्म जागरण, भजना मधुन समाजसेवा करु घोडेगाव चे नाव कायमचे लक्षात राहिल अशीच सेवा करु .असा मनोदय ऋषभ राठोड याने सत्काराला उत्तर देताना ग्वाही दिली.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.