नेवासा – नेवासा बुद्रुक साईनाथनगरचे भाजप नेते विजय डौले यांनी गडाख गटात प्रवेश केला. त्यांच्या मातोश्री विद्यमान सरपंच आहेत. त्यांचा पक्ष प्रवेश माजी आमदारांसाठी धक्का मानला जात आहे.
प्रवेशानंतर बोलताना विजय डौले यांनी सांगितले की, आम्ही तालुका भाजपचे प्रामाणिकपणे काम केले. परंतु पक्षात फक्त मोजक्याच लोकांना संधी देण्याचे काम तालुक्याचे भाजपचे नेतृत्व करत होते. नेतृत्वाच्या स्वार्थापलीकडे काही होत नाही, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान आमदार गडाख यांच्या नेवासा बुद्रुक, साईनाथनगर, लेकुरवाळी आखडा या भागात वाड्या वस्त्यांवर घोंगडी बैठका झाल्या. गडाखांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
एक महिन्यापासून आ. गडाख यांनी तालुका पिंजून काढला आहे. छोट्या छोट्या वस्त्यावर संवाद यात्रा जात आहे. लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीची सत्ता आल्यानंतर आमदार शंकरराव गडाख पहिल्या टप्प्यात मंत्री होणार असल्याचा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करतात. विविध राजकीय प्रलोभन मिळत असतानाही पडत्या काळात ठाकरे यांच्यासोबत राहून गडाख यांनी एकनिष्ठता काय असते हे दाखवून दिल्याचे कार्यकर्ते सांगतात.
नेवासा तालुक्यात पीक विमा नाही, रस्ता, विजेसाठी बजेटमध्ये निधी नाही, २ वर्षापूर्वी गडाख यांनी मंजूर केलेल्या रस्त्याच्या व विजेच्या कामांना सरकारने स्थगिती दिली. याचा ग्रामस्थांनी निषेध केला. तर आमदार गडाख म्हणाले, कुणालाही दोष देऊ नका. थोडा संयम पाळा. विधानसभेनंतर आपण हे सर्व प्रश्न मार्गी लावणार आहोत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.