घोडेगाव – कुटुंबासाठी अनेक अनेक खस्ता खाऊन ही अपेक्षीत असलेले व्यक्तीमत्व बाप.वरुन फणसा सारखा काटेरी पण आतुन गोड गरा म्हणजे बाप. कोणालाच ज्याच्या अंतकरणाचा ठाव लागणार नाही असा बाप .अनेक पौराणीक ,ऐतीहासीक, आहे धार्मिक,कौटुंबिक विषयात बापाचे महत्व तसं दुर्लक्षित राहिले. याच विषयाचा धागा पकडुन बाप म्हणजे काय? या विषयावर प्रा डॉ वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमाचे आयोजक आहेत .श्री घोडेश्वरी सामाजिक प्रतिष्ठान घोडेगाव व समस्त ग्रामस्थ. प्रमुख पाहुणे असणार आहेत अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सह सचिव जयंतरावजी वाघ, सोनई पो स्टेशन चे स पो नी विजय माळी असणार आहेत.
घोडेस्वारी सामाजिक प्रतिष्ठान ने लोक सहभागातुन प्रथम ग्राम दैवत श्री घोडेश्वरी देवी मंदिर जिर्णोद्धार व परिसर विकास काम हाती घेतले. नंतर परिसरातील सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार केला. नवरात्र उत्सव साजरा केला.किमान दोन कोटी रुपयांची विकास कामे कोणत्याही राजाश्रय मदत न घेता फक्त लोक सहभागातून केली आहेत. मोलाचे मार्गदर्शन व साथ लाभत आहे.देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगीरीजी महाराज यांची एवढी विकास कामं लोकाभिमुख असतानाही प्रसिध्दी माध्यमात मात्र कोणा एकाचे वैयक्तीक नाव नसते. असते ते फक्त श्री घोडेश्वरी सामाजिक प्रतिष्ठान व ग्रामस्थांचे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता श्री घोडेश्वरी माध्य विद्यालय घोडेगाव येथे परिसरातील सर्व नागरिकांनी सहकुटुंब सहपरिवार या व्याख्यानस उपस्थीत रहावे असे आवाहन घोडेश्वरी सामाजिक प्रतिष्ठान व ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.