गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची १०८वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.अध्यक्ष स्थानी रामदास सोनवणे हे होते. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांचा सन्मान या वेळी करण्यात आला. नेवासा तालुक्यातील अनेक गावांत कृषी तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली व आधुनिक ज्ञानाचा प्रसार केला त्या अनुषंगाने मेळावा आयोजित केला होता. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ ढगे म्हणाले की आधुनिक कृषी तंत्रज्ञान तील परीवर्तन शेतकऱ्यांनी स्वीकारावे.
रासायनिक खतामध्ये सिलीक्वान ऊस पिकासाठी शिफारशीत खतमात्रा द्यावी.जिवाणू खतांचा वापर करावा बियाणे नवीन जातीचे वापरून ढगाळ हवामानामुळे पडणाऱ्या रोग व किडीचा बंदोबस्त जैविक पद्धतीने करावी. सेवा सोसायटीचे सचिव बाळासाहेब दिघे यांनी अहवाल वाचन केले. या वार्षिक सर्वसाधारण सभेला चेअरमन दिलीपराव लोखंडे, दगडू ईखे, भास्करराव सोनवणे, नानासाहेब रेपाळे, रामदास पाटील सोनवणे संदिप सोनवणे, शंकरराव शेंडगे, बाळू सोनवणे सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी बाळासाहेब सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.