ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

प्रभाकर शिंदे

नेवासा – नेवासा विधानसभा मतदार संघ हा भाजपाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाची ९९ उमेदवाराची पहिली यादी जाहीर झाली.

अहिल्यानगरमधील पाच उमेदवार जाहीर झाले असले तरी भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये नेवासाला स्थान मिळाले नाही. नेवासा मतदारसंघ भाजपाकडे असला तरी येथील उमेदवारी जाहीर झाली नसल्याने नेवासा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला सुटणार असल्याची माहिती वरिष्ठ पातळीवरील सूत्रांकडून समजते.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योजक प्रभाकर शिंदे यांची गुप्त बैठक मागील काही तासात पार पडली आहे आहे असे मुंबईत असलेल्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. मुख्यमंत्री शिंदे व उद्योजक प्रभाकर शिंदे यांची उमेदवारी व पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली आहे.

उद्योजक प्रभाकर शिंदे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी म्हणून ओळखले जाते. तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे. पंचगंगा उद्योगसमूह या नावाने तालुक्यात मोठा व दांडगा जनसंपर्क आहे.

नेहमी सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी अग्रेसर असतात.तसेच वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे साखर कारखाना उभा करत आहे. त्यांचा ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेवासा या जागेसाठी आग्रह आहे धरून प्रभाकर शिंदे उमेदवार असावे असे ही बोले जात आहे.

शिवसेनेचे राज्यातील इतर पाच मतदार संघ भाजपाला सोडले गेले असल्याने नेवासा मतदार संघ हा हमखास शिवसेनेला सुटणार.

नेवासा मतदार संघात अदलाबदल होऊन शिंदेसेनेकडून खूपटी येथील नामांकित उद्योजक आणि पंचगंगा शुगर फॅक्टरीचे प्रमुख प्रभाकर शिंदे पाटील यांची उमेदवारी फायनल झाली असल्याची माहिती वरिष्ठ पातळीवरील सूत्राकडून समजते.

प्रभाकर शिंदे
प्रभाकर शिंदे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रभाकर शिंदे
प्रभाकर शिंदे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रभाकर शिंदे