नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेते आता ग्रामसभेने आई व बहीणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्यात आलेली आहे तरीही जो शिव्या देईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायत कडून करण्यात येणार आहे असे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले
सौंदाळेत झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत जर शिव्या दिल्या तर ५०० रुपये दंड सक्तीने आकरण्यात येईल
शिव्या देताने आईचा व बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शारीरिक अंगा संदर्भात शिवीगाळ करून अर्वाच शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो त्यामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देताना आपल्या आई बहिणींना व मुलीला आठवले पाहिजे कारण शिव्या देणारा व्यक्ती ज्या स्त्रीच्या अंगाचा शिव्या देताना उच्चार करतो तसेच शरीर आपल्या कुटुंबातील महिलेचे असते
शिव्या देण्यावर बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येत आहे असे सरपंच शरदराव आरगडे यांनी म्हंटले आहे
यावेळी बालकामगार बंदीचा ठराव घेण्यात आला बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी “बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा” असे स्लोगन ठरवून बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा त्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस दिले जाईल असे ठरले
सौंदाळा गावामध्ये बालविवाह शंभर टक्के बंदी करण्यात आलेले आहे गावात कुणीही बालविवाह करू नये केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ठरले
सोशल मीडियाच्या मोबाईल मुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचे निदर्शनास आल्याने यापुढे संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत घरातील शालेय विद्यार्थ्याकडे मोबाईल द्यायचा नाही असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला
ठराव सूचना सरपंच शरदराव आरगडे यांनी मांडली व अनुमोदन श्री गणेश आरगडे सर यांनी दिले
यावेळी ग्रामसेवक सौ प्रतिभा पिसोटे उपसरपंच कोमल आरगडे सदस्य मंगल ज्ञानदेव आरगडे, छाया मिनीनाथ आरगडे, भीमराज आढागळे, सुधीर आरगडे, बाळासाहेब आरगडे, चंद्रकांत आरगडे, मंजू आढागळे, माजी सरपंच प्रियंका आरगडे, उषा बोधक, मंगल बोधक, रंजना बोधक, अश्विनी आढागळे, कावेरी आढागळे,यांच्या सह मोठ्या संख्येने आदी महिलांसह पुरुष हजर होते
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.