सोनई- खेडले परमानंद येथील रेशन पासून वंचित असलेल्या नागरिकांनी अनेक वर्षापासून रेशन भेटावे यासाठी वेळोवेळी कागदपत्राची पूर्तता त्याचप्रमाणे काम व्हावे यासाठी आर्थिक रक्कम अदा केली .
परंतु जाड कातडीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जणू नागरिकांचं खेळणं मांडल आहे .जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात सूचना करूनही जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला नेवासा तहसील व पुरवठा विभागाने जणू केराची टोपली दाखवली .
या संदर्भात महसूल मंत्री विखे यांच्याशी नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधला परंतु कामाच्या नावाने निराशाच पदरी पडली .
भारतीय लोकशाहीत जर असा खेळ खंडोबा चालत असेल तर या लोकशाही व्यवस्थेला भेरूड लागल्याचे चित्र स्पष्ट होते .
नेवासा तालुक्यातील अनेक गावांचा हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे .
नेवासा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणार का?
शेवटी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र घेत ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती खेडले परमानंद येथील नागरिकांनी दिली आहे .
नव्याने रुजू झालेले पुरवठा निरीक्षक सुदर्शन दुर्योधन नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती परंतु नागरीकची झाली निराशा .
संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत असलेल्या जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या जिल्ह्यात असा प्रकार पाहावयास मिळत आहे ही मोठी खेदाची गोष्ट आहे .
गावोगावी रेशन विभागाचे अधिकारी धान्य दुकानदारा कडून आर्थिक लाभ घेताना चे चित्र नागरिकांना पहावयास मिळाले .
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.