नेवासा- शेत रस्ते जनन्याय दिनास अधिकाऱ्यांची अनुपस्थिती असल्याने शिव – पाणंद शेत रस्ते चळवळीच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित रस्ता ग्रस्त शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शेत रस्ता व शिव पानंद रस्ता चळवळीच्या माध्यमातून चळवळीचे प्रणेते श्री शरद पवळे व समन्वय श्री दादासाहेब जंगले यांचे मार्गदर्शनाने नेवासा तहसील येथे गुरुवार हा जनन्यायदिन पाळण्याचे तहसीलदार श्री संजय बिरादार यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केले होते त्यानुसार विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा नंतर आलेल्या गुरुवारी जनन्याय दिन घेण्यात येईल असे तहसीलदार यांनी सुचविले होते त्यानुसार
शेत रस्ते शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्या सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात दर गुरुवारी न्याय दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे .या न्याय दिनास २८ नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालयातील फक्त एक लिपिक वगळता संबंधित सर्वच अधिकारी अनुपस्थित होते.
त्यामुळे तालुक्यातील उपस्थित असणाऱ्या ५० -६० समस्याग्रस्त शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली .यावेळी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आमच्या समस्यां सोडुन न्याय देण्यास जबाबदार अधिकारी नसतील तर न्याय कुणाकडे मागायचा. तहसिलदारांचे आदेश होऊनही दोन-तीन वर्षा नंतरही अजून रस्ते बंदच आहेत. रस्ते अडविणारे दाद देत नाहीत. दादागिरी व आडमुठेपणा करुन त्रास देतात. शेती पडीत ठेवावी लागत आहे.आमचे उत्पन्न बंद झाल्याने व मानसिक , शारीरिक , आर्थिक त्रास होत असल्याने आता आम्हाला न्याय कोण अन् कसा देणार असे संबंधित लिपिक उमाप यांना विचारले.
भूमि अभिलेखचे कार्यालय अधीक्षक यांना संपर्क करुनही ते न्याय दिनास आले नाही. तहसिलदार , नायब तहसिलदार नसल्याने आमच्या समस्या सांगायच्या कुणाला ? हा न्याय दिन नसून शेतकऱ्यांवर अन्याय दिन होत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या .याप्रसंगी तालुक्यातील शिव – पाणंद रस्ता चळवळीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नाथा शिंदे , सागर सोनटक्के ,कारभारी गरड , कृष्णा घोडेचोर , भानुदास कावरे , सोमनाथ भोगे , रमेश भक्त , कुशिनाथ फुलसौंदर , संभाजी भाकड , विठ्ठल करमड , इश्वर पाठक , मिनिनाथ घाडगे , कानिफनाथ कदम , काशिराम धाडगे , अनिल सरोदे , बाळासाहेब थोरात , भगवान ब्राम्हणे आदिंसह सुमारे ४० हुन अधिक शेतकरी उपस्थित होते. तसेच आता येत्या गुरुवारी पाच डिसेंबर 2024 रोजी शेतकरी मोठ्या प्रमाणावर येऊन जे न्याय दिन न घेतल्यास नेवासा तहसीलदार तहसील समोर जाहीर आमरण उपोषण करणार आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.