नेवासा : आपल्या नेवासा तालुक्यातील धामोरी गावचे सुपुत्र प्राध्यापक डॉ गणेश रावसाहेब पटारे यांची नुकतीच पुण्यातील डेक्कन येथील नामांकित महाराष्ट्र शासन अनुदानित मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. अतिशय खडतर प्रवासातून त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण केले, धामोरी सारख्या थोड्याशा गावात जेथे आवश्यक तेवढया पायाभूत सुविधांची उपलब्धता नसतांना देखील सर्व अडचणी वर जिद्दीने मात करत उच्च शिक्षण पूर्ण केले, नेवाशातील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय मधून बीकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये एम.कॉम एम.फील त्यानंतर पीएचडी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे, प्राध्यापक पदासाठी आवश्यक राष्ट्रीय शैक्षणिक पात्रता परीक्षा तसेच राज्य शैक्षणिक पात्रता परीक्षा देखील त्यांनी पूर्ण केल्या आहेत. मागील बारा वर्षापासून डॉ गणेश रावसाहेब पटारे पुण्याच्या नामांकित गरवारे महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे काम करत होते त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन प्रवृत्तीमुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान देखील दिले आहे.
त्यांचे आत्तापर्यंत साठ शोधनिबंध विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाले आहेत त्याचबरोबर 25 हून अधिक पुस्तकांचे लिखाण देखील डॉ गणेश पटारे यांनी केले आहे, संशोधनामध्ये विशेष प्राविण्य मिळवून त्यांना सर्वात कमी वयाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मान्यता प्राप्त पीएचडी संशोधक म्हणून बहुमान देखील प्राप्त झाला आहे. सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विद्यार्थी त्यांचे पीएचडीचे संशोधन देखील करत आहेत, महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पणन विभागाचे मार्फत चालवले जाणाऱ्या स्मार्ट प्रोजेक्टचे ते एक प्रशिक्षक म्हणून देखील काम बघत आहेत, गरवारे महाविद्यालयामध्ये कार्यरत असताना त्यांनी विविध पदावरती काम करत महाविद्यालयासाठी त्यांचे योगदान दिले आहे त्यामध्ये प्रामुख्याने आयक्यूएसी मध्ये सचिव या पदावर कार्यरत होते त्यानंतर महाविद्यालयाचा परीक्षा विभागामध्ये देखील त्यांनी कंट्रोलर ऑफ एक्झाम परीक्षा नियंत्रक म्हणून काम बघितले आहे, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापनाच्या अभ्यास मंडळावर देखील त्यांचे नियुक्ती झालेली आहे, त्याचबरोबर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या अभ्यास मंडळावर देखील त्यांची यापूर्वीच नियुक्ती झालेली आहे.
त्यांनी नुकताच पुणे नगर नाशिक या तीन जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या आर्थिक साक्षरता या विषयावरती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने तसेच रिझर्व बँकेचे केंद्रीय मंडळाचे संचालक सतीश मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प पूर्ण करून तो शासनास सादर केला आहे अशा या अतिशय छोट्याशा खेडेगावातील डॉ गणेश पटारे यांचा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी आहे. आर्थिक सामाजिक आणि पायाभूत सुविधांच्या अडचणीवर मात करून शैक्षणिक क्षेत्रात स्वयं सिद्धता घडवून डॉक्टर गणेश रावसाहेब पटारे शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आहे याचा निश्चितच नेवासा तालुक्यातील सर्व जनतेला अभिमान आहे. आमचे माध्यमिक शिक्षक देवगड संस्थान येथील गुरुदत्त माध्यमिक व जळके येथील गुरुदास भास्करगिरी महाराज माध्यमिक विद्यालय आहे.सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ पटारे यांचे ते बंधू आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.