ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

कृषी

नेवासा – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय सोनई च्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे दाखल झाले, असून कृषीदुतांचे स्वागत मक्तापूर गावचे लोकनियुक्त सरपंच सौ. सुशीलाताई लहारे, उपसरपंच सौ. अलकाताई लहारे, माजी सरपंच श्री. छबू बर्डे, ग्रामविकास अधिकारी गरजे डी. व्ही. कृषी सेवक सौ. अंजली धानापुणे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व गावकऱ्यांनी केले. कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता हा प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवणार आहे. कृषीदूत नाविन्य रींधे, अभिषेक दरंदले, तेजस पोपेरे, तुकाराम भोये, राहुल सहाणे, हे विद्यार्थी गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

कृषी

या दरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष गावात जाऊन प्रथम सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांची जीवनमान, यांचा सामाजिक, आर्थिक स्तर, गावातील पीक पद्धती, नैसर्गिक संसाधने, अशा विविध गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे, तसेच शेतकऱ्यांना माती परीक्षण व पाणी परीक्षण, विविध पिकांवरील रोग किडींचा व्यवस्थापन, हवामान बद्दल,आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल कृषिदूत माहिती देणार आहेत. कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमात अंतर्गत शेवटच्या चार आठवड्यात विद्यार्थी कृषी आधारित व्यवसाय किंवा उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतील, या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. एच.जी. मोरे, उपप्राचार्य प्रा. एस. व्ही. बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले, कार्यक्रमाधिकारी प्रा. जे. एम. वाघमारे, प्रा. आर. एस. गोंधळी, प्रा. आर. टी. दिघे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

newasa news online
कृषी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृषी
कृषी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कृषी