गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील झापवाडी येथील माजी सरपंचास मारहाण झाली असल्याची घटना घडली आहे.
पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. १ रोजी घोडेगाव एम आय डी सी येथील एका कंपनी येथे फिर्यादी पांडुरंग नाना वाघ वय ३० हे कंपनीचे पोल मोजत असताना त्या ठिकाणी शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख रा. घोडेगाव व त्याचा एक साथीदार असे दोघे दुचाकीवरून त्या ठिकाणी आले व तु या पुढे एम आय डी सी तिल हे काम आम्हाला विचारल्या शिवाय करायचे नाही. असे म्हणत फिर्यादीस मारहाण करु लागले.
शाहरूख ऊर्फ चाट्या जावेद शेख याच्या हातात चाकु व त्याच्या मित्राच्या हातात लोखंडी राॅड होता. तसेच फिर्यादी स त्यांच्याच चार चाकी वाहनातून शिंगवे तुकाई फाटा येथील एका हाॅटेल च्या मागे घेऊन गेले व पुन्हा एकदा मारहाण करुन गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. दाखल फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. ४७३/२०२४ बिएनएस चे कलम १३७(२), ११५(२), ३५२,३५१(२) (३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई काकासाहेब राख हे करत आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.