ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मतदान

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुन पराभवानंतर विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात मोहीम सुरु करण्यात आली आहे. राज्यातील आंदोलनाची दखल घेऊन निवडणूक आयोगाने काँग्रेससह विरोधकांना चर्चेसाठी बोलवले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाला चॅलेंज देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मतदानास प्रशासनाचा विरोध आहे. गावात कलम १४४ लागू केले आहे. त्यानंतरही मतदान घेणारच असल्याचे उत्तम जानकर यांनी म्हटले आहे.

मतदान

माळशिरस विधानसभा मतदारसंघात उत्तमराव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. परंतु ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरु केले. त्यांनी गावात बॅलेट पेपरवर अभिरूप मतदान करण्याचा निर्णय घेतला. ३ डिसेंबर रोजी हे मतदान होणार आहे. परंतु त्याला प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यावर बोलताना उत्तम जानकर म्हणाले, प्रशासनाच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. जमावबंदी आदेश लागू असला तरीही माघार घेणार नाही. कितीही गुन्हे दाखल झाले तरीही उद्या मतदान प्रक्रिया होणारच आहे.

गावात जमावबंदी लागू

मारकडवाडी गावात प्रशासनाने आजपासून जमावबंदी लागू केली आहे. पुढील तीन दिवस जमावबंदी लागू असणार आहे. ईव्हीएम विरोधात मतपत्रिकेवर ग्रामस्थ मतदान घेणार होते. दरम्यान या निर्णयावर गावात दोन गट झाले आहे. जानकर यांच्या मर्जीतील चार पुढाऱ्यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता हा मतदानाचा निर्णय घेतला आहे, असा आरोप दुसऱ्या गटाने केला आहे.

मतदान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मतदान
मतदान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मतदान
error: Content is protected !!