गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव सध्या अवैध धंद्याचे आगार बनले आहे. या साठी भ्रष्टाचार समितीने आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. याबाबत सविस्तर सोनई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या घोडेगाव सह परिसरातील अनेक गावा गावात दारू मटका, बिंगो, गावठी दारू, गावठी कट्टे , बेकायदा हाॅटेल व्यवसाय या सर्व बेकायदा व्यवसाय मुळे आजची तरुण पिढी भरकटत जावून या दारू ,मटका , गावठी दारू याच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे. या सर्वांना पोलीस प्रशासन जबाबदार आहे. शुक्रवार हा येथील जनावरांचा, तसेच भाजीपाला बाजार दिवस असतो.
दुर वरुन शेतकरी आपला माल या ठिकाणी विक्री साठी आणत असतात. येथील चौफुला वर पोलिसांकडून तसेच काही गुंडाकडुन दादागिरी करून पैसे वसुल करण्याचा कार्यक्रम सुरू असतो.येथील बिट अंमलदार या वर कारवाई करण्या ऐवजी तसेच या सर्वांची माहिती असून सुध्दा या अवैध व्यवसायीकां कडून वसुली करण्यातच दंग असतो. पोलीस या गुंडांचा बंदोबस्त करणार का नाही. या सर्वांना वेळीच बंदोबस्त न केल्यास भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते रवीदादा आल्हाट तसेच संघटनेचे पदाधिकारी व घोडेगाव ग्रामस्थ यांचे वतीने येत्या काही दिवसात कुठलीही सुचना न देता आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे .या मध्ये वरिष्ठांनी वेळीच दखल लक्ष घालून या सर्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.