ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

लंघे

नेवासा – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विजयासाठी प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नेवासा शहरात मताधिक्य मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या भाजपचे युवा नेते मनोजभाऊ पारखे यांचा सत्काराद्वारे गौरव करण्यात आला.महायुतीच्या समर्पित कार्यकर्त्यांमुळे विठ्ठलराव लंघे पाटील यांना शहरातून मताधिक्य मिळाले यामध्ये सर्वच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे योगदान असल्याचे प्रतिपादन मनोजभाऊ पारखे यांनी यावेळी बोलतांना केले.
विधानसभा निवडणुकीत महायुती शिवसेनेचे उमेदवार आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विजयासाठी युवकांनी मताधिक्य देण्याचा निर्धारच केला होता नेवासा शहरामध्ये समर्थपणे प्रचाराची धुरा सांभाळल्याबद्दल भाजप,शिंदे गट शिवसेना,राष्ट्रवादी अजितदादा गट या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन मनोजभाऊ पारखे यांनी योग्य मोर्चेबांधणी केली होती.महायुतीच्या समर्पित कार्यकर्त्यांमुळे विठ्ठलराव लंघे पाटील यांना शहरातून मताधिक्य मिळाले असल्याची प्रतिक्रिया भाजपचे युवा नेते मनोजभाऊ पारखे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.

लंघे


यावेळी बोलतांना मनोजभाऊ पारखे म्हणाले की नेवासा शहरात एकूण सतरा वार्ड असून प्रत्येक वार्डात घर टू घर जाऊन शासकीय योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी घराघरात पोहचवली,नागरीकांच्या अडीअडचणी देखील समजून घेतल्या.लाडक्या बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य व उपेक्षित असलेल्या घटकांना मिळावा म्हणून आपण स्व:त भाजपच्या कार्यालयात मोफत अर्ज नोंदणी करून याबाबत मार्गदर्शन केले त्यामुळे सुमारे दोन हजार महिलांचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरल्या गेले.त्याचा फायदा लाडक्या बहीणीनी केलेल्या मतदानाद्वारे झालेला दिसला असे सांगितले
नेवासा शहरातील गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना सोबत घेत प्रभाग निहाय सूक्ष्म नियोजन करत प्रचार केला यामध्ये माझ्यावर विश्वास ठेवून मोठ्या शक्ती समोर न डगमगता प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची विचारधारा जपत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी अहोरात्र परिश्रम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते हेच खरे विजयाचे शिल्पकार असल्याचे प्रतिपादन मनोजभाऊ पारखे यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलतांना केले.

लंघे


यावेळी झालेल्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी भाजपचे जेष्ठ मार्गदर्शक डॉ.लक्ष्मणराव खंडाळे,भास्करराव कणगरे,जेष्ठ विधी तज्ञ अँड.संजीव शिंदे,अजित नरुला, सतीश गायके,निरंजन डहाळे, तानाजी गायकवाड,विलास बोरुडे,संतोष चांदणे,शुभम सपकाळ,गणेश गाढवे,राजेश कडू,सचिन कडू,शिवा लष्करे, रामदास लष्करे, ऋषिकेश दारुंटे, बाळासाहेब दारुंटे,सागर पवार,दत्ता आहिरे,कैलास लष्करे,अक्षय शिंदे,सागर कुसमाडे,आकाश कुसळकर, प्रकाश को-हाळे, गणेश गायकवाड,रोहित लष्करे,सुधाकर शेंडे,मंगेश गोसावी,गोविंद कदम,रोहित कोकाटे,करण पोटफोडे,श्रावण रेनिवाल, सागर मंजुळकर यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

newasa news online
लंघे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लंघे
लंघे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लंघे